Digital UDID Card-Disability Certificate कसे काढायचे? सोप्पी पद्धत जाणून घ्या!

जर तुम्ही दिव्यांग आहात आणि तुमच्याकडे दिव्यांग प्रमाण पत्र म्हणजेच Disability Certificate नसेल तर तुम्ही सरकाने सुरु केलेल्या खूप साऱ्या योजना पासून दूर राहू शकता. सरकारने दिव्यांग बांधवासाठी खूप साऱ्या योजना महाराष्ट्रात तसेच संपूर्ण भारत भर सुरु केल्या आहेत. या योजनाचा लाभ घेण्यासाठी तुमच्या कडे UIDI Card आणि Disability Certificate असणे गरजेचे आहे.

मी घेल्या काही दिवसापूर्वी दिव्यांग प्रमाणपत्र बनवले आहे. त्यासाठी मला खूपच त्रास झाला. या पुढे तुम्हाला असा त्रास झाला नाही पाहिजे म्हणून Disability Certificate Online Registration ची संपूर्ण माहिती मी लेख मध्ये दिली आहे.

UDID Card सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाअंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग – Department of Empowerment of Persons with Disabilities (DEPwD) द्वारे दिले जाते. हे कार्ड दिव्यांग व्यक्तींसाठी एक ओळखपत्र म्हणून कार्य करते, ज्यामुळे सरकारी फायदे आणि सेवांना प्रवेश मिळवणे सोपे होते.

UDID कार्ड मध्ये एक Unique ID नंबर असतो ज्यात अपंग व्यक्तीच्या वैयक्तिक माहिती आणि दिव्यांगतेबद्दलची माहिती असते. यामुळे सरकारला दिव्यांग व्यक्तींच्या राष्ट्रीय डेटा एका ठिकाणी ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे भविष्यातील योजना राबविण्यात मदत होते.

📌 घरबसल्या UDID Card-Disability Certificate दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

घरबसल्या ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खालील सोपी स्टेप्स फॉलो करा –

📍अधिकृत वेबसाईटला भेट द्या

➡️ Google वर जाऊन Swavlambancard, UDID Card, Disability Certificate सर्च करा. (किंवा डायरेक्ट swavlambancard.gov.in ला visit करा.)

➡️Registration Form वर click करा

UDID Card-Disability Certificate कसे काढायचे? सोप्पी पद्धत जाणून घ्या!

 

📍 Personal Details:

UDID Card-Disability Certificate कसे काढायचे? सोप्पी पद्धत जाणून घ्या!

➡️ Applicant’s Full Name : येते दिव्यांग व्यक्तीचे पूर्ण नाव लिहावे. ( आधार कार्ड प्रमाणे)
➡️ Applicant Mobile No. : तुमचा mobile नंबर ऍड करा( या नंबर तुम्हाला OTP येतो. जर नंबर आधारकार्ड ची लिंक असेल तर खूप चांगले )
➡️ Applicant Email Id : तुमची ई-मेल आयडी लिहा.
➡️ Applicant Date Of Birth : दिव्यांग व्यक्तीची जन्म तारीख लिहा.
➡️ Gender : स्री, पुरुष नमूद करावे.
➡️ Name of Applicants Father/Mother/Guardian : या मध्ये तुम्ही अपंग व्यक्ती चे आई वडील व Guardian चे नाव नमूद कराव लागेल.
➡️ Photo : फक्त 5 KB ते 100 KB आकाराच्या jpeg, jpg आणि png प्रतिमांना परवानगी आहे आणि 800px पेक्षा कमी रुंदी आणि उंची असलेल्या फोटो फोटो अपलोड करू शकता.
➡️ Signature / Thumb / Other Print : फक्त 3 KB to 30 KB आकाराच्या jpeg, jpg आणि png फोटो अपलोड करू शकता.

Image Size कमी करण्यासाठी येते click करा.

📍Proof of Identity Card:

➡️ Do you have Aadhaar card?: तुमच्याकडे आधारकार्ड आहे कि नाही हे नमूद करा. असेल तर yes वर नसेल No वर क्लिक करा.
➡️ Aadhaar No.: आधारकार्ड नंबर नमूद करा. आणि I agree to share Aadhaar information with Govt. ➡️ Department. वर tick करा.
➡️ Identity Proof: आधार कार्ड सिलेक्ट करा.
➡️ Upload Identity Proof: आधारकार्ड अपलोड करा. (फक्त jpeg, jpg, png and pdf आणि size 10 KB to 500 KB एवढी करू शकता. )

📍Address for Correspondence:

➡️ Address: पूर्ण पत्ता नमूद करा.
➡️ State / UTs: राज्य नमूद करा.
➡️ District: जिल्हा कोणता ते नमूद करा.
➡️ City / Sub District / Tehsil: तुमचा तहसील ऑफिसचे नाव लिहा.
➡️ Village / Block: गाव ग्राम पंचायत नमूद करा.
➡️ Pincode: Address वरचा पिनकोड नमूद करा.

📍Disability Details:

➡️ Disability Type : अपंगत्वाचा प्रकार नमूद करा.
➡️ Disability Due To: अपंगत्व कशामुळे आले आहे हे सांगा.
➡️ Disability by Birth: अपंगत्व जर जन्मा पासून असेल तर Yes type करा अथवा No type करा.

📍Hospital for assessment/issue of UDID card /disability certificate:

➡️ Is your treating hospital in other State/District ? : येते No click करा.
➡️ Captcha: Captcha fill करा आणि खाली दिलेलय बॉक्सवर क्लिक करा आणि Submit button वर click करा.

📍Final Submit, Download application & Download Receipt

➡️ Final Submit: फॉर्म सबमिट झाल्यावर एकदा चेक करून घ्या आणि जर काही चुकीचे भरले असेल edit button वर क्लिक करून दुरुस्त करू घ्यावा. जर सर्व बरोबर असेल तर Final Submit वर क्लिक करा.
➡️ फायनल सबमिट केल्यानंतर तुम्हा Download application आणि Download Receipt करून प्रिंट काढून घ्या.

जर तुम्हाला फॉर्म भरण्यास अडथळा येत असेल तर तुम्ही आमचा WhatsApp Group जॉईन करू शकता. 
UDID Card-Disability Certificate कसे काढायचे? सोप्पी पद्धत जाणून घ्या!

 

📍UDID Card-Disability Certificate साठी जवळील जिल्हा रुग्णालयाला भेट द्या.

➡️ Download केलेले application आणि Receipt चे झेरॉक्स जवळील रुग्णालयात घेऊन जावे लागेल. (UDID Card-Disability Certificate साठी जिल्हा रुग्णालयात बुधवारचा वार असतो. प्रत्येक जिल्यात हा वेगळा असू शकतो) त्यानंतर डॉक्टर तुमचे चेकअप करतील आणि तुम्हाला वैद्यकीय डॉक्टरकडे पाठवतील. वैद्यकीय डॉक्टर तुम्हाला एक Railway Concession Form देतील त्या फॉर्म ला तुमचा एक फोटो चिटकवून, Application, Receipt, आधारकार्ड झेरॉक्स आणि रुग्णालयाचा केस पेपर याचा एक सेट बनवा. Railway Concession Form चा ओरिजनल सेट रुग्णालयात जमा करावा लागेल आणि झेराक्स सेट तुमच्याकडे ठेवायचा आहे.

➡️ Documents सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक तारीख दिली जाईल त्यादिवशी तुम्हाला डिजिटल प्रमाणपत्र UDID Card-Disability Certificate दिले जाईल.

UDID Card-Disability Certificate चे मुख्य फायदे.

  1. Unique ओळखपात्र : प्रत्येक कार्डधारकाला एक अद्वितीय ID नंबर मिळतो.

  2. दिव्यांगतेचे तपशील: कार्डमध्ये दिव्यांगतेचे सर्व तपशील दिले जाते.

  3. केंद्रित डेटाबेस: एकाच डेटाबेसद्वारे सरकार लक्ष केंद्रित करून सेवा देणे शक्य होते.

  4. योजनेचे फायदे: कार्डधारकांना सरकारी फायदे, सवलती आणि हक्क सहज मिळवता येतात.

  5. एकच डॉक्युमेंट: UDID Card अपंगत्वाची संपूर्ण माहिती असते त्यामुळे इतर documents घेऊन फिरण्याची गरज नसते, कारण सर्व आवश्यक माहिती एकाच ठिकाणी मिळते.

 

 

दिव्यांग प्रमाणपत्र online Form भरता येत नाही ?

जर तुम्हाला UDID Card-Disability Certificate online Form भरता येत नसेल तर तुम्ही ग्रुप जॉईन करून आम्हाला संपर्क करू शकता.

📞 दिव्यांग प्रमाणपत्र हेल्पलाईन क्रमांक

📌 राष्ट्रीय हेल्पलाईन (सर्व राज्यांसाठी):
➡️ टोल-फ्री नंबर: 1800-11-4515
➡️ ईमेल: helpdesk@swavlambancard.gov.in
➡️ अधिकृत पोर्टल: swavlambancard.gov.in

📌 महाराष्ट्र दिव्यांग प्रमाणपत्र हेल्पलाईन:
➡️ फोन: 022-22025226
➡️ ईमेल: disability.maharashtra@gov.in

सरकारी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी अपंगत्व प्रमाणपत्र खूप महत्वाचे आहे. पूर्वी अनेक सरकारी कार्यालयांना भेट द्यावी लागत असे, परंतु आता ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाल्यामुळे ते घरबसल्या मिळू शकते. वर दिलेल्या चरणांचे अनुसरण करून तुम्ही सहजपणे अपंगत्व प्रमाणपत्र मिळवू शकता.

सर्वसाधारण प्रश्न (FAQs).

UDID कार्डने ट्रेनचे तिकीट आरक्षित करता येईल का?

हो, कार्ड वापरून तुम्ही रेल्वे तिकीटावर सवलत मिळवू शकता.

UDID कार्ड भारतभर वैध आहे का? 

हो, ते देशभरात स्वीकारले जाते.

UDID कार्ड मिळवायला किती वेळ लागतो?

नोंदणी केल्यानंतर साधारणपणे 10 ते 15 दिवस लागतात.

Aadhaar UDID कार्डसाठी आवश्यक आहे का?

हो, आधारकार्ड आवश्यक आहे.

UDID कार्ड Digilocker मध्ये लिंक करू शकतो का?

हो, कार्ड Digilocker मध्ये लिंक केला जाऊ शकतो.

 

Leave a Comment